Breaking

राजुर घाटात सुरक्षा भिंत तोडून दरीत कोसळला ट्रक ट्रक उलटल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात झाला कैद

बुलढाणा

*राजुर घाटात सुरक्षा भिंत तोडून दरीत कोसळला ट्रक*

*ट्रक उलटल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात झाला कैद*

बुलढाणा – मलकापुर मार्गावरील राजूर घाटात आज 10 ऑक्टोंबर च्या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एक ट्रक पलटी झाला होता आणि काही क्षणातच तो सुरक्षा भिंत तोडून दरीत कोसळला, परंतु सुदैवाने झाडामुळे काही अंतरावर अडकून पडला.. या घटनेमुळे मार्गावरील पाहतील जवळपास दीड तास विस्कळीत झाली होती… मिळालेल्या माहितीनुसार मलकापूरहुन बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाचा राजूर घाटातील एका वळणावर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला होता, त्याला क्रेनच्या साह्याने उभे करण्यात आले होते, आणि नंतर हा ट्रक घाटाची सुरक्षा भिंत तोडून दरीत पलटी झाला, सुदैवाने झाडात हा ट्रक अडकलेला असल्याची माहिती बोराखेडीचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी दिली आहे, दरम्यान घटना स्थळावरील एका नागरिकाने ट्रक पलटी होतानाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.