Breaking

प्रवास करताना .. सावधान वाहनाच्या व्यतिरिक्त मोकाट जनावरे अपघातास होऊ शकता कारणीभूत…. मोहाडी नजीक कारचा भीषण अपघात ; २ ठार, ३ जखमी

बुलढाणा
स्पॉट मोहाडी
* प्रवास करताना वा सावधान वाहनाच्या व्यतिरिक्त मोकाट जनावरे अपघातास होऊ शकता कारणीभूत….

मोहाडी नजीक कारचा भीषण अपघात ; २ ठार, ३ जखमी

खामगाव-जनावर आडवे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कार पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या भीषण अपघातात एक सहा वर्षीय बालक व वृध्द महिला जागीच ठार झाली. ही दुर्घटना पहाटे ५.३० वाजेदरम्यान चिखली रोडवरील मोहाडीनजीक घडली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील अवचार कुटुंबिय काही कामानिमित्त पहाटे चिखलीकडे कार क्र. एमएच २८ बीके ६२१५ ने जात होते. दरम्यान, मोहाडी-गणेशपूर रस्त्यावर अचानक त्यांच्या वाहनाच्या समोर जनावर आडवे आले. यामुळे भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकली. या भीषण अपघातात कारमधील सौ. नंदा विठ्ठल अवचार (६०) व ऋषभ अंगत अवचार (६) हे दोघे जागीच ठार झाले. तर अंगत विठ्ठल अवचार (३५), सौ. माधुरी अंगत अवचार (३०), कु. परी अंगत अवचार (२) हे तिघे गंभीर जखमी झाले. पती-पत्नी असलेल्या अवचार दाम्पत्य व त्यांची दोन वर्षीय मुलगी हिच्यावर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगत विठ्ठल अवचार हे चिखली येथील भारतीय स्टेट बँकेत कर्मचारी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.