Breaking

शेगाव _उज्जैन बस पलटी होऊन ६ प्रवासी जखमी लासुरा फाट्यावरील घटना.

शेगाव _उज्जैन बस पलटी होऊन ६ प्रवासी जखमी लासुरा फाट्यावरील घटना.

खामगाव (टीम बुलढाणा टुडे) चालकाचे नियंत्रण सुटल्याने भडगाव वेगातील लक्झरी बस रोडच्या कडेला नाल्यात पलटी होऊन सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी शेगाव रोडवरील लासुरा फाट्यांच घडली. एका खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस सकाळी प्रवासी घेऊन शेगाव उज्जैनला निघाली होती. दरम्यान लासुरा फाटा रस्त्याच्या कडेला नाल्यात पलटी झाली. या अपघातात बसमधील बबलू एकनाथ तायडे ,अंबादास गोविंद बुलकडे ,पवन शालीग्राम तायडे ,गणेश पांडुरंग असलमोर , अमन खान सय्यद खान , समदाबी अमन खान,खामगाव हे सहा प्रवासी जखमी झाले .त्यामुळे त्यांना उपचार करतात सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.वृत्तलेपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता .या अपघातात लक्झरीचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.