Breaking

शासकीय तंत्रनिकेतन खामगांवच्या संगणक आणि विद्युत शाखांनी मिळविले एन.बी.ए.मानांकन

शासकीय तंत्रनिकेतन खामगांवच्या संगणक आणि विद्युत शाखांनी मिळविले एन.बी.ए.मानांकन

अभियांत्रिकी संस्थेत शिकविल्या जाणा-या अभ्यासक्रमांची गुणवत्ता तपासणी करून त्यांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडीटेशन नवी दिल्ली (राष्ट्रीय प्रमाणन मंडळ) द्वारे मानांकन प्रदान केल्या जाते. शासकीय तंत्रनिकेतन, खामगांव
येथे अभियांत्रिकी संस्थांसाठी आवश्यक असलेले मानांकन संगणक आणि विद्युत अभियांत्रिकी या २ विभागांना १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२८ असे ३ वर्षांकरीता नुकतेच प्रदान केल्या गेले आहे. अशा पद्धतीने संस्थेतील मागील वर्षी मानांकन मिळविलेल्या अणुविद्युत व स्थापत्य आणि नुकतेच मानांकन मिळविलेल्या संगणक आणि विद्युत याप्रमाणे ४ शाखा एन.बी.ए. मानांकित झालेल्या आहेत तर यंत्र अभियांत्रिकी विभागाला २ वर्षांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाद्वारे (एमएसबीटीई) दोन वर्षांसाठी “अति-उत्कृष्ट” मानांकन मिळालेले आहे. अशा तऱ्हेने संस्थेतील सर्वच शाखांना उत्कृष्टतेचे मानांकन मिळालेले आहे.

मूल्यांकनासाठी नवी दिल्ली येथून आलेल्या समितीने आपल्या भेटीदरम्यान
निकषानुसार कागदपत्रांद्वारे अभिलेख व संसाधनांची पाहणी केली आणि संस्था स्तरावर विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध असलेल्या सोई सुविधांचा प्रत्यक्षात आढावा घेतला जसे की कर्मशाळा, ग्रंथालय, अॅकेडमिक्स, संगणक प्रयोगशाळा, भौतिकशास्त्र प्रयोगशाळा, रसायनशास्त्र प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा,
कार्यालय, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह, जिमखाना, खेळांची मैदाने, माजी विद्यार्थी सभागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुलींसाठी स्वतंत्र विश्रामकक्ष, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, प्रशिक्षण व आस्थापना
कक्ष, प्लेसमेंट रेकॉर्ड्स, कार्यालयातील आस्थापना विभाग, लेखा विभाग, विद्यार्थी विभाग, कर्मचा-यांचे पगारपत्रक, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती इत्यादी सर्व बाबी तपासून पाहिल्या.

संगणक व विद्युत विषयतज्ञ यांनी दोन्ही विभागातील सैध्तान्तिक व प्रयोगशाळेच्या सर्व शैक्षणिक बाबी, अध्यापन पद्धती, अभ्यासक्रमाचे नियोजन, व्याख्याने, प्रयोगशाळा सत्रे आणि अंतर्गत मूल्यमापन कसे घेतले जाते याची माहिती तपासली व सर्व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी शैक्षणिक बाबींवर संवाद साधला. दुसऱ्या दिवशी संस्थेत माजी विद्यार्थी, उद्योजक व पालक यांची सभा मुल्यांकन समिती समवेत घेण्यात आली
होती, ज्यामध्ये अनेक प्रतिथयश माजी विद्यार्थी व उद्योगपतींनी सहभाग घेतला होता. तसेच संस्थेतील कार्यरत अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

याबाबतीत बोलतांना प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी “मूल्यांकन
मिळाल्यामुळे संस्थेला अनेक महत्त्वाचे फायदे होतात जसे की शैक्षणिक गुणवत्तेची खात्री, रोजगार क्षमतेत वाढ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता, विद्यार्थ्यांच्या नोंदणीत सुधारणा, सतत गुणवत्ता सुधारणा, संशोधन आणि निधी मिळविण्यासाठी मदत, शैक्षणिक कर्जामध्ये लाभ आणि अधिकारी कर्मचार्यांना प्रोत्साहन इत्यादि. थोडक्यात एनबीए मूल्यांकन
संस्थेच्या शैक्षणिक दर्जात, विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधींमध्ये आणि संस्थेच्या एकूण प्रतिष्ठेमध्ये लक्षणीय सुधारणा करते” असे प्रतिपादन केले.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर यांच्या सकारात्मक उर्जेमुळे व कल्पक नेतृत्वाखाली, सहसंचालक प्रा मनोज अंधारे यांच्या मार्गदर्शनातून व प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांच्या कौशल्यपूर्ण प्रशासनात संस्थेतील संगणक आणि विद्युत विभागप्रमुख अनुक्रमे प्रा संदीप
परांजपे व प्रा मनोज मुंदडा, संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी, समन्वयक डॉ प्रसाद बाहेकर, सहसमन्वयक प्रा सोहन चोपडे, तज्ञ प्रा गजानन पदमणे, शैक्षणिक अवेक्षक व जिमखाना उपाध्यक्ष प्रा राजेश मंत्री, माजी
विद्यार्थी संगठन सचिव प्रा सचिन सोनी, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा अंकुश दवंड व सर्व विभागप्रमुख डॉ राजीव वाकोडकर, प्रा गजानन पदमणे, प्रा विजय आटोळे, प्रा समीर कुलकर्णी, प्रा गौरव भोयर, प्रा अमेय पाटील आणि त्यांची
चमू, प्रबंधक श्री योगेश भुसारी, श्री महेंद्र राणे यांचेसह संस्थेतील
सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले असे प्रसिध्दीप्रमुख प्रा राजेश मंत्री यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.