Breaking

*रक्तदान सर्वश्रेष्ठ दान*…राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न..

राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्या वतीने 4 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 42 जणांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
या शिबिरामुळे शासकीय रक्तपेढीतील रक्तसाठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे.निवडणुकीची धामधूम ओसरल्यानंतरही संदीप शेळके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे. साधारणपणे उन्हाळ्यात बर्‍याच शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे रक्ताची जास्त प्रमाणात गरज भासते.परंतु सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
ही बाब लक्षात घेऊन राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संदीप शेळके यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याकरिता पुढाकार घेतला. निवडणुकीची धामधूम ओसल्यानंतरही त्यांची सामाजिक बांधिलकी कायम असल्याचे या माध्यमातून दिसून आले. युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरात 42 जणांनी रक्तदान केले. राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. गतवर्षी संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त 3100 पिशव्या रक्तसंकलन झाले होते. तर यावर्षी सुद्धा 3300 पिशव्या रक्तसंकलन झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.