Breaking

यंदा श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन.. गण गण गणात बोतेच्या गजरात संत नगरी दुमदुमली

शेगाव

*यंदा श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन*
धुमधडाक्यात होणार साजरा श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आहे. गजानन महाराजांचा प्रकट दिन शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यंदा 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन महाराष्ट्रासह अख्ख्या देशभरात साजरा केल्या जाणार आहे. गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अगदी कमी भाविकांच्या उपस्थितीत प्रगट दिनाचा सोहळा पार पडला. मात्र यंदा श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन आहे आणि त्यातच सगळीकडे निर्बंधमुक्त वातावरण असल्याने, यावर्षी शेगांव येथे देखील भाविकांची तुफान गर्दी दिसुन येणार आहे.
गजानन महाराज लोकांच्या दृष्टीस : माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले.
145 वा प्रकटदिन :’गण गण गणात बोते’चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. यंदा 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन महाराष्ट्रासह अख्ख्या देशभरात प्रचंड उत्साहात साजरा केल्या जाणार आहे.
भाकरीचा प्रसाद :लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ‘गीतारहस्य’ ही भगवदगीतेवर टीका लिहिली..
विदर्भवारी : आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला. कारणपरत्वे महाराजांनी अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या ठिकाणीही भ्रमंती केली. त्यामुळे आजही विदर्भात सर्व ठिकाणी आजही गजानन महाराजांना भक्ती भावाने पूजल्या जाते.
पंढरपूर पालखी : गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. १९६७ पासून गजानन महाराज पालखी माध्यमातून गजानन महाराज खेड्या- पाड्यापर्यंत पोहोचले. विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे.
सप्ताह साजरा :श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराज संस्थानसह श्रींच्या मंदिरामध्ये माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य सप्तमी असे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. होम-हवन,कीर्तन,प्रवचन,भजन,काकडा, हरिपाठ,’श्रीं’ च्या विजय ग्रंथाचे पारायण अशा अध्यात्मिक कार्यक्रमांनी हा सप्ताह साजरा केला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.