Breaking

आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव..

बुलढाणा
*आज 427 वा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा*
देश विदेशातील जिजाऊ भक्त व शिवप्रेमींची उपस्थिती..

बुलढाणा ..जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघाचे वतीने आज 12 जानेवारी रोजी 427 वा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जिजाऊ सृष्टी येथे भव्य दिव्य व थाटामाटा साजरा करण्यात येत आहे. या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्य सह भारतातील व जगभरातील जिजाऊ भक्त व शिवप्रेमी लाखोच्या संख्येने सहभागी होत आहे.
427 व्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची भव्य दिव्य सुरुवात सकाळी सहा वाजता जन्मस्थळ राजवाडा येथे मराठा सेवा संघाच्या प्रमुख जोडप्यासह महापूजा संपन्न होत. व त्यानंतर सकाळी सात वाजता वारकरी दिंडी सोहळा जन्मस्थळ राजवाडा ते जिजाऊ सृष्टी येथून भव्य पालखीसह निघून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक वारकरी दिंड्यांचा सहभाग असतो. व सकाळी नऊ वाजता जिजाऊ सृष्टी येथे शिवधर्म ध्वजारोहण संपन्न होत सकाळी नऊ ते 11 या सत्रात मध्ये महाराष्ट्रातील नामवंत शाहीर आपल्या संचासह पोवाडे सादर करतात. सकाळी 11 ते दीड वाजेपर्यंत जिजाऊ सृष्टी हॉल येथे नवोदित वक्ते नवोदित कलाकार यांचा सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या स्तरावरील उल्लेखनीय कामगिरी वरील केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार प्रकाशित सोहळा व नोंदणी केलेल्या जोडप्यांचा सामूहिक शिव विवाह सोहळा संपन्न होत असतो .मुख्य कार्यक्रम दुपारी दोन ते पाच यावेत शिवधर्म पीठ येथे संपन्न होईल. हा कार्यक्रम शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल .या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे व 32 कक्षाचे कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी व राज्य कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व लोकप्रतिनचा समावेश असतो.
*पोलिसांचा तगडा बंदोबस्त*
जन्मोत्सव निमित्त मातृ तीर्थावर नागरिकांची होणारी गर्दी पाहता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे .अमरावती ,अकोला यवतमाळ, वाशिम येथून पोलीस बंदोबस्त बोलण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी व्यक्तिशः येथील बंदोबस्ताची पाहणी 11 जानेवारी रोजी केली. येथे जवळपास बाराशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असल्याचे माहिती आहे.
*जिजाऊ सृष्टीवर लक्षवेधी बुक स्टॉल*
जिजाऊ जन्मोत्समित्त जिजाऊ सृष्टीवर मोठ्या प्रमाणावर पुस्तकाची विक्री होते येथे जवळपास 400 पेक्षा जास्त बुक स्टॉल लावण्यात आले आहेत परिवर्तनवादी चळवळीतील पुस्तकांची याद रेलचेल आहे. येथे जवळपास शंभर भोजन स्टॉली उभारण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.