Breaking

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे ‘शेतकरी सन्मान आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलन पार पडले...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे ‘शेतकरी सन्मान आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलन’ पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ‘राष्ट्रीय शेतकरी दिना’निमित्त प्रगतीशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले.

🔸प्रगतीशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान :
कृषी विज्ञान केंद्रातून पाॅलिहाऊस शेतीचे प्रशिक्षण घेऊन आधुनिक शेती करणाऱ्या सन्मानमूर्ती श्रीमती अंजली बाळासाहेब वामन यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान
सोलापूर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणाऱ्या सन्मानमूर्ती श्रीमती अनिता योगेश मालगे यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

🔸प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घराची प्रातिनिधिक स्वरुपात चावी देऊन सन्मान :
श्रीमती शांताबाई बबन जगदाळे
श्रीमती सुरेखा नवनाथ मुळे

तसेच यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या काही लाभर्थ्यांनी आणि सर्व शेतकर्‍यांच्या वतीने शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेणार्‍या काही शेतकर्‍यांनी आपले मनोगत व्यक्त करत केंद्र व राज्यशासनाचे आभार देखील मानले.

श्रीमती मंगल गजानन हिलम यांनी पीएम आवास योजनेच्या अंतर्गत २ लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त करत शासनाचे आभार मानले
श्री. विशाल बबन वेताळ यांनी पीएम आवास योजनेच्या टप्पा क्रमांक २ च्या माध्यमातून घरकुल मंजूर झाल्याबद्दल मनोगत व्यक्त करत शासनाचे आभार मानले
कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने डाळिंब व सीताफळ उत्पादक व ‘लखपती शेतकरी’ असा नावलौकिक मिळवलेल्या डाॅ. शशिकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत शासनाचे आभार मानले
कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने फलोत्पादन, फळ प्रक्रिया उद्योग उभा करणारे समीर डोंबे यांनी मनोगत व्यक्त करत शासनाचे आभार मानले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.