Breaking

ना. आकाशदादा फुंडकर यांचे शहरात आगमनानिमित्त स्वागताची जय्यत तयारी

*ना. आकाशदादा फुंडकर यांचे शहरात आगमनानिमित्त स्वागताची जय्यत तयारी*

राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. आकाशदादा फुंडकर यांचे उद्या २२ डिसेंबर २४ रोजी शहरात आगमन होत आहे. तत्पुर्वी दुपारी १ वाजता नागपुर येथुन शेगाव येथे आगमन होणार असुन याठिकाणी मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजीत १७व्या उप वधु-वर महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहणात आहेत. दुपारी १.३०
वाजता श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींचे दर्शन, दुपारी २.३० ते ३.४५ वाजता जळगाव जामोद मतदार संघ भाजपाच्या वतीने शेगाव येथे आयोजीत सत्कार समारंभास उपस्थित राहणार आहे. दुपारी ४ वाजता श्री सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस येथील स्व. भाऊसाहेब फुंडकर
यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शहराकडे प्रयाण करतील. दुपारी ४.३० वाजता भाजपाच्या वतीने आयोजीत सत्कार समारंभात उपस्थित राहतील. यानंतर वसुंधरा निवासस्थानाकडे प्रयाण करतील, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी अनिकेत पेसोडे यांनी दिली. तर शहरात आगमन
झाल्यानंतर शेगाव नाका येथून रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली चांदमारी चौक, विकमशी चौक, टिळक पुतळा, केडिया टर्निंग येथे पोहोचल्यानंतर
ना. आकाशदादा फुंडकर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून परत येतील. यानंतर रॅली महावीर चौक, मोहन चौक, फरशी, शहीद भगतसिंह चौक, एकबोटे चौक, टॉवर चौक, म.गांधी बगिचा, अग्रसेन चौक, भाटीया चौक असे मार्गक्रमण करीत गांधी चौक येथे पोहोचणार आहे. याठिकाणी जाहीर सभेने रॅलीचा समारोप होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.