Breaking

हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ .22 वर्षीय युवतीने संपवली जीवन यात्रा….

बुलढाणा
स्पॉट देऊळगाव माळी
बुलढाणा

अजूनही होत आहे हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ 22 वर्षीय युवतीने संपवली जीवन यात्रा

हुंनड्या साठी शारीरिक मानसिक छळ व सासरच्या जाचाला कंटाळ एका २२ वर्षे विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव याचे ढोल वाजवले जात असताना .बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दुर्गम देऊळगाव माळी येथे 30 सप्टेंबर रोजी ही दुःखात घटना घडली .या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच जणांना अटक केली आहे राधिका पवन खेत्री वय वर्ष 22 असं आपली जीवन यात्रा संपवलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे .राधिकाला फक्त आठ महिन्याची चिमुकली असून या घटनेने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की दीड वर्षांपूर्वी मृत राधिकाचा विवाह पवन विश्वनाथ खेत्रे याचां सोबत झाला होता. विवाह झाल्यापासून पती व सासरवाडी मंडळी राधिकाला सतत माहेरू पैसे आणण्याकरता तकादा लावत होते. दरम्यान आठ महिन्यापूर्वी गौरी नावाची मुलगी झाली होती .मुलीला होणारा त्रास बघून राधिकाच्या कडील मंडळींनी सासरकडील मंडळी सोबत दोन वेळेस बैठका घेऊन काही पैसे दिले होते. मात्र तरीसुद्धा सासरकरी मंडळी राधिकाचा छळ करीत होते. यामध्ये राधिका चां पतीचा देखील समावेश होता .मात्र सततचा मानसिक छळ होत असल्याने अखेर राधिकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली .एकंदरीत मन मिळावं शांत स्वभावाचा राधिका ने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसर हळूहळू गेला आहे .दरम्यान राधिकाच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राधिकाच्या पती सह ५ जणां वर गुन्हा दाखल केला आहे .या ५ जणांना अटक देखील करण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.