Breaking

आता खामगाव शहरात एका छताखाली सर्व वस्तू मिळण्याची सुविधा.. विजय लक्षमी ग्रुप कडे ग्राहकांचा वाढता कल मुख्यतः ग्रामीण भागातील ग्राहकांचे खरीदी साठी पावलेही पडत आहे विजय लक्ष्मी ग्रुप कडे…i

आता खामगाव शहरात एका छताखाली सर्व वस्तू मिळण्याची सुविधा.. विजय लक्ष्मी ग्रुप कडे ..

शहरी भागासह ग्रामीण भागातील ग्राहकांचा खरेदीचा वाढता कल
खामगाव (वा. प्र.)
सध्या सर्वत्र दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू आहे .आणि त्यातही आता लहान लहान गावापर्यंत उच्च दर्जाचे सेवा देणारे मॉल पोचल्याने आता ग्रामीण भागांना देखील या मॉलमध्ये खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे .तसेच खामगावतील स्थानिक चिखली बायपास बुलढाणा रोड स्थिती गेल्या चार वर्षापासून शेवट रुजू झालेल्या लक्ष्मी ग्रुपच्या सुपर मार्केटला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे. खामगाव शहरापासून जवळच असलेल्या या विजयलक्ष्मी सुपर मार्ट ला बाराही महिने ग्राहकांची मोठी पसंती असते. तर त्यात जातात दिवाळीच्या खरेदीला एकच गर्दी होत आहे. एका छताखाली जीवनावश्यक वस्तू सह इत्यादी वस्तू साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. किराणा व वस्तू खरेदीवर वेळोवेळी देण्यात येणारी सूट तसेच दिवाळी बचत महोत्सव एका आकर्षण असून विजय लक्ष्मी सुपर मार्केट ग्राहकांच्या पसंतीच उतरले आहे .विजय लक्ष्मी ग्रुप चे एन टी बापू देशमुख यांनी शहर नजीक चिखली बायपास वर तब्बल चार एकरावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .यामध्ये जीवनावश्यक वस्तू अर्थात किराणामालासाठी ४२०० स्क्वेअर फुटावर भव्य दालन उपलब्ध आहे. येथे किराणामालासाठी सुपर मार्केटचे पार्किंग युनिट असून प्रत्येक माल निवडून क्लीन करून दिला जात असल्याच ग्राहक सांगत असल्याची माहिती सुपर मार्ट चे संचालक अजिंक देशमुख यांनी दिली. यंदा ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे त्यामध्ये 3500 रुपयांच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली व सुहाना चिवडा मसाला ५० ग्रॅम ,पाच ते सात जणांच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली व गॅस लाइटर ,सात ते दहा हजाराच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली, कुंडी व सुहाना मसाला, तसेच दहा हजार रुपयांच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली, कुंडी चिवडा मसाला व कप सेट सहा नग ,मोफत देण्यात येत असून ब्रॅण्डेड वस्तूवर पाच टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. एकंदरीत आता ग्रामीण भागात हि विजय लक्ष्मी सुपर मार्ट दालन ग्राहकांकरिता खरेदीसाठी एक पर्वणी ठरत आहे.. असे म्हटल्यास वावग ठरणार नाही..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.