Breaking

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दौरा

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दौरा

पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील शनिवार, दि. 27 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पाटील यांच्या दौऱ्यानुसार, शनिवार, दि. 27 जुलै रोजी सकाळी 5.40 वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल. सकाळी 7.30 वाजेपर्यंत शासकीय विश्राम भवन येथे आगमन व राखीव राहणार असून त्यानंतर शासकीय विश्राम भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समिती व डोंगरी विकास आढावा बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक घेतील. दुपारी 1.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक घेतील. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव राहणार आहे. दुपारी 3 वाजता अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव राहील. त्यानंतर सोईनुसार बुलडाणा येथून शेगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण करतील. रात्री 9 वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.