Breaking

शेगावला श्रीराम नवमी उत्सवाला यायचं असेल तर कसा असेल कार्यक्रम जाणून घेऊया* गजानन महाराज संस्थानमध्ये श्रीराम नवमी उत्सवास थाटात सुरुवात……

संत नगरीमध्ये गण गण गणात बोते चा गजर..!

श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये ९ एप्रिल पासून श्रीराम नवमी उत्सवास थाटात सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षीप्रम ाणे यावर्षीही श्रीराम नवमी निमित्त श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून ९ एप्रिल पासून सकाळी

६ ते ६.४५ काकडा, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० किर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. ९ एप्रिल वार मंगळवार रोजी हभप अनंत बुवा बिडवे बार्शी यांचे कीर्तन पार पडले असून १० एप्रिल वार बुधवार रोजी हभप राजेंद्र बुवा आंबेकर केकत निंभोरा, ११ एप्रिल गुरुवार रोजी हभप बळीराम बुवादौड अकोला, १२ एप्रिल वार शुक्रवार रोजी हभप अनिरुद्धबुवा क्षिरसागर सावरगाव माळ, १३ एप्रिल शनिवार रोजी हभप गणेश बुवा हुंबाड महागाव, १४ एप्रिल रविवारला ह भप प्रकाश बुवा शास्त्री धुळे, १५ एप्रिल सोमवार रोजी हभप विठ्ठल बुवा राठोड (आसोला ना), १६ एप्रिल मंगळवार रोजी हभप पंकज बुवा गावडे देहू तर १७ एप्रिल बुधवारला श्रीराम नवमीच्या दिवशी ह. भ. प.

श्रीहरी बुवा वैष्णव जालना यांचे कीर्तन होणार आहे. १७ एप्रिल श्रीराम नवमीच्या दिवशी मिती चैत्र शु. ९ बुधवारला ह. भ. प. श्रीराम बुवा ठाकूर (परभणी) यांचे सकाळी १० ते १२ श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. बुधवार १७ एप्रिलला सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल व दुपारी उत्सवाची रथ, अश्वासह पालखी परिक्रमा निघेल. तसेच १८ एप्रिल मिती चैत्र शु. १० गुरुवारला हभप श्रीराम बुवा ठाकूर परभणी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहांडी गोपालकाला होणार आहे. तसेच सर्व उत्सव व विशेष प्रसंगी आणी वर्षभरात येणाऱ्या शेकडो दिंड्या, पालख्या तसेच शोभायात्रा व मिखणुकीमुळे श्री मंदिर परिसरात आधीच असणाऱ्या प्रचंड गर्दीमध्ये आणखी वाढ होत आहे. करीता भाविक भक्तांची सुरक्षा व

सुव्यवस्था लक्षात घेऊन, प्रसंगी कोणतीही अनुचित व अप्रिय घटना घडू नये म्हणून गर्दीचे नियोजनासाठी विविध मार्गदर्शक स सूचना व निर्देशानुसार खबरदारीची उपाययोजना म्हणून ह्या सर्व दिंड्या, पालख्या, शोभायात्रा व मिरवणुकी ह्या सर्व सदर १२ मीटर रस्त्यावरील श्री मंदिर परिसराचे पश्चिमद्वारातून आत येतील. सर्व देवी-देवतांचे व संत-महंतांचे, ब्राह्मणवृंदांद्वारा पुजन करून संबंधीतांचा यथोचित सत्कार तसेच सहभागी सर्व भाविकांना चहापान इत्यादी सोपस्कार पार पडून ह्या दिंड्या, पालख्या, शोभायात्रा व मि रवणुकी श्री मंदिर परिसराच्या दक्षिण द्वारातून पुढे मार्गस्थ होतील. यासाठी श्री संस्थानच्या नियोजनास सर्वांनी सहकार्य करून सहयोग प्रदान करावा. असे आवाहन श्रींचे सेवाधारी विश्वस्त व समस्त सेवाधारी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.