Breaking

परिमंडळातील वीज चोर महावितरणच्या रडारवर* *फॉल्टी मीटर,सरासरी वीज बिल,शुन्य वीजबिल,कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकाची होणार तपासणी*

*परिमंडळातील वीज चोर महावितरणच्या रडारवर*

*फॉल्टी मीटर,सरासरी वीज बिल,शुन्य वीजबिल,कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकाची होणार तपासणी*

बुलडाणा/अकोला,दि.०८ जानेवारी २०२५:

वीज चोरी विरोधात अकोला परिमंडळात जोरदार मोहिम उघडण्यात आली असून या मोहिमेत महावितरणकडून विभागानुसार ३० ते ४० पथके तयार करण्यात आली आहेत. आगामी तीन महिने सतत चालणाऱ्या या मोहिमत महावितरणकडून थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता यांनी दिली आहे.

कार्यकारी संचालक(प्रकल्प)धनंजय औंढेकर यांनी नुकताच व्हिडीवो कॉन्फरंन्सच्या माध्यमातून घेतलेल्या आढावा बैठकित वीज गळती व वीज हानी विरूध्द नाराजी व्यक्त करत वितरण हानी १५%पर्यंत कमी करण्याचे उध्दीष्ट दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात महावितरण अकोला परिमंडळात वीज चोरीविरोधात मोहिम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिेमत, फॉल्टी मीटर,सरासरी वीज बिल ,शुन्य युनिटचे बिल,अत्यल्प वीज वापर अश्या सर्वच ग्राहकांची तपासणी करण्याला सुरूवात करण्यात आली आहे.

तसेच सवलत देऊनही अभय योजनेत कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले जे ग्राहक सहभागी झालेले नाहीत व त्यांनी पुनर्जोडणी घेतलेली नाही. अश्या कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या सर्वच ग्राहकाची प्रत्यक्ष तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे.या मोहिमेत वीज जोडणीच्या ठिकाणी अवैधपणे आढळणाऱ्या वीज पुरवठ्याविरूध्द विद्युत कायदा २००३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच थकबाकी असलेल्या ठिकाणी शेजाऱ्यांकडून अनाधिकृत वीज जोडणी देण्यात आली असेल,तर त्या शेजारी ग्राहकांवरही कायदेशीर कारवाई होणार आहे.

वीज चोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे विद्युत वाहकावर, रोहित्रावर त्याच्या मर्यादेच्या पलीकडे भार पडतो, परिणामी रोहित्रात बिघाड होतो.शॉर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्याचा नाहक त्रास नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांवर होतो व महावितरणलाही त्याचा मोठा आर्थीक फटका होतो.याशिवाय वीज पुरवठा खंडित झाल्यावर महावितरणला ग्राहकाच्या रोषाला सामोरे जावे लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.