Breaking

जामनेर केकत निंभोरा ते शेगाव दिंडी चे खामगावात स्वागत १३ वर्षापासूनचा अखंडित नित्यक्रम..

रवींद्र कुलकर्णी व परिवार सदस्यांच्या वतीने प्रसाद वितरण..

खामगाव…
*जामनेर केकत निंभोरा ते शेगाव दिंडी चे खामगावात स्वागत*
१३ वर्षापासूनचा अखंडित नित्यक्रम..
*श्री क्षेत्र विठ्ठल रुक्माई मंदिर केकत निंभोरा ते शेगाव पायी दिंडी सोहळा*

खामगावात रवींद्र कुलकर्णी व परिवार सदस्यांच्या वतीने प्रसाद वितरण..

मागील तेरा वर्षांपासून श्री शेत्र विठ्ठल रुक्माई मंदिर जामनेर केकत निंभोरा ते शेगाव पायी दिंडी सोहळा ६० ते ७० वारकऱ्यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो. सदरू दिंडी ही नित्य क्रमाने मागील तेरा वर्षापासून हा उपक्रम राबवत असते .या अंतर्गत यावर्षी 26 फेब्रुवारी 2023 ते १ मार्च 2023 पर्यंत या पायी दिंडीचा उपक्रम पार पडला. यानिमित्ताने एक मार्च रोजी मुक्कामाच्या खामगाव मध्ये श्री रवींद्र रामदास कुलकर्णी व त्यांच्या परिवार सदस्यांच्या वतीने नित्य नियमाप्रमाणे पालखीचे स्वागत व वारकऱ्यांना प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखीमध्ये सहभागी शेगाव श्री गजानन महाराज संत नगरी येथे मागील तेरा वर्षापासून पायदळ वारी करत असलेले भक्तगण मध्ये केकत निंभोरा येथील सरपंच अमोल प्रताप पाटील ,संभाजी दौलत शिंदे निलेश एकनाथ भुरे, किशोर माऊली शिंदे ,नाना रामधन पाटील ,ज्ञानेश्वर म्हस्के ,अमोल चिकटे ,सुभाष शिंदे
यांच्यासह केकत निंभोरा येथील गजानन भक्त मंडळ सदस्य मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. दररोज जावपास वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर कापत पाच दिवसांमध्ये श्रीभक्त शेगावात दाखल होतात. पालखीनिमित्त रवींद्र कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पालखीचे स्वागत . श्रींच्या पालखीची आरती आणि त्यानंतर दुपारच्या विश्रामानंतर पुढील प्रवासाकरता पालखी शेगाव करता रवाना होत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.