Breaking

वीज बिल भरण्याला प्रतिसाद न दिल्यास होणार वीज पुरवठा खंडित* _मुख्य अभियंता,राजेश नाईक_ *२४६ कोटी रूपयाच्या वसूलीसाठी वरिष्ठ अधिकारीही रस्त्यावर*

*वीज बिल भरण्याला प्रतिसाद न दिल्यास होणार वीज पुरवठा खंडित*

_मुख्य अभियंता,राजेश नाईक_

*२४६ कोटी रूपयाच्या वसूलीसाठी वरिष्ठ अधिकारीही रस्त्यावर*

महावितरणच्या अकोला परिमंडळातील वीज ग्राहकांचे वीजबिल भरण्याकडे होत असलेले दुर्लक्ष महावितरणची चिंता वाढविणारा आहे. परिणामी २४६ कोटी रूपयाच्या थकीत वीजबिलाच्या वसूलीसाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात वीज बिल वसूली मोहिम तीव्र करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारीही रसत्यावर उतरले आहे.

वीजबिल वसुली हा महावितरणचा एकमेव आर्थीक स्त्रोत असल्याने प्रत्येक महिन्यात १०० टक्के वसूली होणे अपेक्षित आहे,परंतू तसे होत नसल्याने महावितरणला कारवाईसाठी मोहिम तीव्र करावी लागली. मोहिमेत थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रत्येक कर्मचाऱ्याला कारवाईचे उध्दीष्ठ निश्चित करण्यात आले आहे.

परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ५ लाख ३ हजार ५३७ घरगुती ग्राहकाकडे १९१ कोटी ७२ लाख थकीत आहे,तसेच वाणिज्यिक वर्गवारीतील ३२ हजार ८८६ ग्राहकाकडे २२ कोटी ३४ लाख रूपयाचे वीजबिल थकले असून सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गवारील ७ हजार ६६७ वीज ग्रारकांकडे १० कोटी रूपये वीजबिलाचे थकीत आहे.

वीज ग्राहकांना अखंडित सेवा देण्यास महावितरण जबाबदार असून,वीजेचे बिल वेळेत भरण्याची जबाबदारी वीज ग्राहकांनी घ्यावी,तसेच महावितरणच्या प्रत्येक कर्मचारी यांनी आपल्या क्षेत्रातील थकबाकीदार वीज ग्राहकांना वेळेत आणि प्राधान्याने बिल भरण्याची सवय लावावी,अन्यथा प्रतिसाद न देणाऱ्या ग्रारकांचा वीज पुरवठा खंडित करून त्याची नोंद ऑनलाईन प्रणालीत करावी,तसेच संबंधित ग्राहकाची थकबाकी वीज ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून वसूल करून थकबाकी,पुनर्जोडणी शुल्क आणि सुरक्षा ठेव भरल्याशिवाय त्या वीज ग्राहकाचा वीज पुरवठा पुर्ववत न करण्याचे निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.