Breaking

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादितकडून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य तसेच देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख रुपये आणि परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख रुपये मर्यादेत कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

या योजनेमध्ये उमेदवारांना बँकेत भरलेल्या व्याजाच्या 12 टक्केपर्यंत व्याज परतावा मिळणार आहे. याकरिता उमेदवाराचे वय हे 17 ते 30 वर्षे असावे, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचा पुरावा, इतर मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रूपयांपर्यंतचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत, बारावीमध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा, उमेदवार आणि पालकांचे आधार कार्ड, फोटो, आधारकार्डशी संलग्न बँकेतील बचतखाते पासबुक, वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागपदपत्रे सादर करावी लागणार आहे. ही योजना ऑनलाईन असून महामंडळाच्या www.msobcfdc.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावे लागणार आहे.

राज्य, देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासक्रमामध्ये येणारे अभ्यासक्रम आरोग्य विज्ञानमधील सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम, अभियांत्रिकीमधील सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रमामधील कृषि, अन्न प्रक्रिया व पशू विज्ञान, दुग्ध विज्ञानमधील सर्व संबंधित अभ्यासक्रम यात समाविष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.