Breaking

वीज वापरली आहे तर बिल भरलेच पाहिजे*; _प्रादेशिक संचालक तथा कार्यकारी संचालक श्री परेश भागवत_ *’चलता है’ संस्कृतीला थारा नाही – स्पष्ट इशारा*

*वीज वापरली आहे तर बिल भरलेच पाहिजे*;
_प्रादेशिक संचालक तथा कार्यकारी संचालक श्री परेश भागवत_

*’चलता है’ संस्कृतीला थारा नाही – स्पष्ट इशारा*

वितरण हानी कमी करा, कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या वीज ग्राहकाची तपासणी करा,फिडर इंडेक्सिंगनुसार बिलींग करा,ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या बिलाची १००% वसुली करा आणि ग्राहकांना नियमित आणि वेळेत वीजबिल भरण्याची सवय लावा असे निर्देश देतांना महावितरणमध्ये काम करतांना चलता है कल्चर यापुढे कदापी सहन केल्या जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रादेशिक संचालक नागपूर तथा कार्यकारी संचालक मुंबई परेश भागवत यांनी दिला.

विद्युत भवन येथे आयोजित केलेल्या महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता राजेश नाईक,अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके (बुलडाणा), अजश शिंदे(वाशिम), अजितपालसिंह दिनोरे (प्र.अकोला) ,सर्व विभागीय कार्यकारी अभियंते,व्यवस्थापक वित्त व लेखा,सर्व उपविभागीय अभियंते आणि उपव्यवस्थापक वित्त व लेखा या बैठकीला उपस्थित होते.

प्रादेशिक संचालक नागपूर यांना अकोला परिमंडळाच्या पालकत्वाची जबाबदारी दिल्यानंतर, त्यांनी घेतलेली ही पहिली आढावा बैठक होती. यावेळी बोलतांना भागवत म्हणाले की,वीज ही मुलभूत गरज आहे, त्यामुळे अखंडित सेवा देण्याची जबाबदारी महावितरणची आहे.त्यासाठी देखभाल दुरूस्तीची कामे वेळोवेळी आणि गरजेनुसार करून घेतली पाहिजे.तांत्रिक अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी प्रशासन कायम मदतीसाठी तयार आहे. मागेल त्याला तत्काळ वीज जोडणी देण्याचे धोरण महावितरणने स्विकारले आहे,परंतू क्षेत्रिय कार्यालयात ती तत्परता दिसून येत नसल्याची नाराजी प्रादेशिक संचालकांनी व्यक्त केली.

महावितरणकडून पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजना आणि मागेल त्याला सौरकृषी पंप योजना या शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.त्यामुळे रूफ टॉप सोलरसाठी मीटर रिलीज करण्याला आणि मीटर लावल्यानंतर रिडींग सिन्क्रोनाईज होण्यास अडथळा निर्माण होणार नाही याची दखल घ्या.मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.त्यामुळे सर्व्हे करण्यासाठी महावितरणकडून डेडीकेटेड लाईनमनची नियुक्ती करण्यासोबत इतर तत्सम तांत्रिक बाबी तातडीने पुर्ण करण्यात याव्यात.जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लवकर लाभ मिळेल.

महावितरणकडून टिवोडी मीटर लावण्याचे काम सुरू आहे.परंतू एएमआयएसपी मार्फत मीटर लावण्यात आल्यानंतर त्याचे रिप्लेसमेंट वेळेत भरा .त्यामुळे ग्राहकांना फॉल्टी स्टेटसने सरासरी युनिटचे बिलींग होणार नाही आणि ग्राहकाचे टिवोडी मिटरबद्दल संभ्रम निर्माण होणार नाही. तसेच ग्राहकांना टिवोडी मिटरचे फायदे सांगा , प्रती युनिट मिळणार असणारी सुट आणि बिलींगबाबतची अचूकता ग्राहकांना पटवून द्या.

यावेळी प्रादेशिक संचालक भागवत यांनी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना,आरडीएसएस योजनेचा एजन्सिनिहाय आढावा घेतला.तसेच तीनही जिल्ह्यातील वीजबिल वसुली,कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले ग्राहक,देखभाल दुरूस्ती, नविन वीज जोडणी आदीचा उपविभागनिहाय आढावा घेत काम वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश दिले.

*प्रादेशिक संचालकाकडून -उपकार्यकारी अभियंता गीरी यांचा सन्मान:-*
महावितरणने ग्राहकाभिमूख धोरण अंगीकारले आहे.त्यामुळे अभियंते व कर्मचाऱ्यांनी आपला दृष्टीकोण बदलावा,तक्रारीपेक्षा आपण उपायावर भर द्यावे आणि योग्य नियोजन करून सेवा सुधारण्यावर भर दिल्यास हमखास यश मिळते असे ते बोलले.यावेळी उपकार्यकारी अभियंता मानोरा उपविभाग श्री गीरी हे दोन्ही पायांनी अपंग असूनही त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोणाचे आणि काम करण्याच्या जिद्दीचे बुके देवून प्रादेशिक संचालक यांनी कौतूक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.