Breaking

एकीकडे निवडणुकीची धामधूम तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्त्याची अभिनव एन्ट्री

बुलढाणा लोकसभे करता सध्या सर्वत्र धामधूम सुरू असताना. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या निवडणुकीमध्ये कामाला लागला आहे .आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या व्यथा आणि समस्या या कशा मांडाव्यां याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश चंद्र रोटे यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या स्वतःच्या तोंडाला काळाफासून सर्वसामान्यांच्या मागण्या ज्यामध्ये मुख्यतः जिल्ह्यात भेडसावत असलेली पाणीटंचाई असलेल्या गावांची मागणी पूर्ण करावी. व मतदानावर बहिष्कार टाकलेल्या गावात त्यांनी केलेल्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या. व बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांची तातडीने बदली करण्यात यावी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारी चौकशी करावी.
याकरता त्यांनी अभिनव पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश घेत मांडलेली भूमिका व त्याचा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात सर्वत्र समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

निवडणुकीच्या धामधुमीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकीकडे निवडणूक पार पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये लागले असताना सर्वसामान्य जनतांच्या व्यथा कोण मांडणार त्यातच आदर्श आचारसंहितेचा बडगा व त्याचा अतिरेक होऊ नये याकरिता एका सामाजिक कार्यकर्त्याने हे अभिनव पद्धतीने मांडलेले पाऊल त्यावर विचार केला जातो का हे पाहावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.