Breaking

शेगाव श्री गजानन महाराज संस्थान.. दर्शनामध्ये मोठा बदल..!

*बुलढाणा ब्रेक*

*आज खग्रास चंद्रग्रहण..*

शेगाव श्री गजानन महाराज संस्थान.. दर्शनामध्ये मोठा बदल..!

श्रींचे दर्शन जाळीतून होणार…!

*मंदिर परिसरातील भक्तांकर्ता प्रसादाला दिवसभर राहणार बंद..*

अँकर आज खग्रास चंद्रग्रहण असल्याने विदर्भची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील भाविकांकरता दर्शनाकरता मोठा बदल करण्यात आला आहे. श्री दर्शनाकरिता श्रींचे मंदिर खुले राहील .मात्र भक्तांना जाळीमधून श्रींचे दर्शन घेता येईल. तसेच श्रींची सकाळ व माध्यान्हाची आरती होणार नाही. श्री मंदिर परिसरातील महाप्रसादालय आज बंद राहील. श्री मंदिर परिसर सोडून इतर सर्व ठिकाणची प्रसादालय ,अल्पपोहार कक्ष नेहमीप्रमाणे सुरू राहतील. श्रींचे दर्शनात जाताना आज सकाळी ६.४३ मिनिटांपासून ते सायंकाळी ६.४७ मिनिटांपर्यंत हार ,पान फुले नारळ प्रसाद सोबत नेऊ नये.
मुख्य म्हणजे आज धुलीवंदनानिमित्त आनंद सागर अध्यात्मिक केंद्र अवलोकनार्थ बंद राहील असे देखील श्री गजानन महाराज संस्थान च्या वतीने सांगण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.