Breaking

१ मे महाराष्ट्र दिन कामगार दिन निमित्त खामगाव महावितरण च्या वतीने क्रिकेटचे सामने संपन्न*

१ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त महावितरण प्रीमियर लिग क्रिकेट सामने संपन्न...

खामगांव
*एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन निमित्त खामगाव महावितरण च्या वतीने क्रिकेटचे सामने संपन्न*
खामगाव(प्रतिनिधि)
१ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त महावितरण प्रीमियर लिग क्रिकेट सामने संपन्न.
महावितरण खामगाव वतीने महावितरण मधील कर्मचारी यांच्या करिता कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त भव्य क्रिकेट चे सामने आयोजित करण्यात आले होते.
या मध्ये बुलडाणा सर्कल अंतर्गत कार्यरत १०० हून अधिक वीज कामगार, कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षक यांनी सहभाग घेतला होता. सहभागी खेळाडू यांची एकूण 8 टीम महावितरण वॉरियर्स, महावितरण टायगर्स, महावितरण टायटन्स, महावितरण स्पार्कर, महावितरण पैंथर, महावितरण रायडर्स, महावितरण रॉयल, महावितरण सुपर किंग बनवून त्यांच्या मध्ये डॉ बाबासाहेब क्रीडा संकुल खेल का मैदान खामगाव येथे दिनांक २८ एफ्रिल व १ मे रोजी सामने घेण्यात आले. यामधे प्रथम क्रमांक महावितरण रायडर्स (रोख 5000 व ट्रॉफी )यांनी तर दुसरा क्रमांक महावितरण पैथर (रोख 3000 व ट्रॉफी ) यांनी मिळवलेमॅन ऑफ द सिरीज उमेश निमकर्ड बेस्ट बॉलर सचिन मुळे, बेस्ट बेस्टमन राहुल मोरे यांना मिळाला. तसेच प्रत्येक सामण्या करिता मॅन ऑफ द मॅच देण्यात आले असून सर्व खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता जसमतिया साहेब यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
सामने यशस्वी करण्याकरिता खामगाव मधील कर्मचारी यांनी अधक परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.