Breaking

खामगाव आठवडी बाजारात मोठी आग. सुदैवाने जीवित हानी नाही.

बुलढाणा
स्पॉट खामगाव
*खामगाव आठवडी बाजारात मोठी आग. सुदैवाने जीवित हानी नाही. अकोला शेगाव खामगाव येथील अग्निशामक दलाचे अथक परिश्रम.. सद्यस्थितीत आग आटोक्यात…

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आठवडी बाजार असलेल्या दुकानांना रात्री बारा वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले. मात्र रात्रीची वेळ असल्याने दुकानातील सामानांचेच मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाले नाही आग विझवण्यासाठी अकोला शेगाव खामगाव येथील अग्निशामक दलाने तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर या आटोक्यात आणली. ही आग एवढी भयंकर होती की संपूर्ण परिसर आगी चया रौद्ररूपामुळे सर्वत्र. धूर झालं होता .मध्यवस्तीत व परिसरात रहिवाशी वस्ती असल्याने नागरिकांनी आपला जीव मुठीत घेऊन रात्र काढली .एकंदरीत अग्निशामन दलाच्या अथक परिश्रमाने आग नियंत्रण . व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. ही आग कशामुळे व का लागली याबाबत कळू शकले नाही .अत्यंत दाट वस्तीत असलेले हे शहरातील जुना दुकानांचा व्यवसायिकांचा भाग असल्याने या आगीत मोठे नुकसान झाल्याचे कळते.
या आधी मध्ये आठ ते नऊ दुकान आगीच्या भक्षक स्थानि सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगी मध्ये भाजीपाला, पान टपरी नाश्ता सेंटर ,इलेक्ट्रॉनिक दुकान , किराणा या दुकानांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.