Breaking

मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात मोठी जबाबदारी, प्रतापराव जाधवांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

बुलढाणा
मेहकर

मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात मोठी जबाबदारी, प्रतापराव जाधवांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात पहिली जबाबदारी सोपवण्यात आली असून, माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतापराव जाधव हे बुलडाण्याचे खासदार आहेत. ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिंदेगटासोबत आलेल्या १२ खासदारांमध्ये प्रतापराव जाधव यांचाही समावेश होता. आता स्थायी समितीमध्ये केलेल्या बदलांनंतर केंद्रातील मोदी सरकारने प्रतापराव जाधव यांना माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिंदे गटातील ९ जणांना स्थान देण्यात आले होते. तसेच केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिंदे गटाला एक-दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात पहिली जबाबदारी सोपवण्यात आली असून, माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतापराव जाधव हे बुलडाण्याचे खासदार आहेत. ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिंदेगटासोबत आलेल्या १२ खासदारांमध्ये प्रतापराव जाधव यांचाही समावेश होता. आता स्थायी समितीमध्ये केलेल्या बदलांनंतर केंद्रातील मोदी सरकारने प्रतापराव जाधव यांना माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.