Breaking

मिशन ओ-2 व खामगाव नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ग्रीनाथॉन स्पर्धा संपन्न…… स्पर्धेचे मान्यवरांनी केले कौतुक….

खामगाव
मिशन ओ-2 व खामगाव नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ग्रीनाथॉन स्पर्धा संपन्न……
स्पर्धेचे मान्यवरांनी केले कौतुक….
.
वृक्ष लागवड ही काळाची गरज असून याकरता दरवर्षी मिशन O 2 च्या वतीने ग्रीनेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेचे हे यावर्षीचे चौथे वर्ष होते.
यावर्षी प्रमुख उपस्थिती म्हणून आयपीएस अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद म्हणून लाभले होते. सकाळी या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली जवळपास 2000 पेक्षा जास्त वृक्षारोपण यावेळेस करण्यात आली मान्यवरांनी या स्पर्धेला भरभरून कौतुक केले. व आपले मनोगत विशद केले.
स्पर्धेत विजेते ठरलेले स्पर्धक….

*ग्रीनाथॉन स्पर्धेतील विजेते असे आहेत*

ग्रीनाथॉन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक प्रशिक घंटे (अमरावती), द्वितीय क्रमांक देवानंद दांडगे (आकोला), तृतीय क्रमांक नेमन शिंदे (नाशिक), महिला गटात प्रथम क्रमांक प्रणाली संजय शेगोकार (शेगाव), द्वितीय क्रमांक प्रियंका ओक्सा (नाशिक), तृतीय क्रमांक सलोनी लव्हाळे (अमरावती) यांना रोख बक्षीस, मेडल व प्रमाणपत्र कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आले. विजेत्यांना प्रमाणपत्रही कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आले.
स्पर्धेला यशस्वी करण्याकरता संपूर्ण मिशन O2 परिवार सदस्य, खामगांव नगरपालिकेचे कर्मचारी ,खंडोबा मित्र मंडळाचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.