Breaking

वारे निवडणुकीचे….*उमेदवार देत आहे संत नगरीतून प्रचार सुरू करण्यावर भर*

निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनीही घेतले होते श्रींचे दर्शन..

सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने उमेदवार हे मुख्यतः संतनगरी शेगावला निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी किंवा निवडणुकीचे प्रचार नारळ फोडण्याकरता अग्रक्रम देत आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांनी अर्ज भरण्यापूर्वी सकाळी श्रींचे दर्शन घेऊन अर्ज दाखल केला होता .तर अपक्ष उमेदवार म्हणून वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी प्रचाराचा नारळ संतनगरी शेगावातून फोडल्यानंतर मतदारांशी संवाद साधला.
*संदीप शेळकेंनी संत नगरी शेगावातून फोडला प्रचाराचा नारळ* शेगावात रोड शो करून साधला मतदारांशी संवाद;म्हणाले,मला फक्त ५ वर्षे द्या, पुढच्या वेळी प्रचाराची गरज पडणार नाही..
वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलडाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी काल,१० एप्रिलला आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. संत नगरी शेगावातून संत श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शेळके यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शेगाव शहरात भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता.
शेगाव शहरातून संदीप शेळके यांच्या प्रचारार्थ निघालेल्या भव्य रोड शो द्वारे शेळके यांनी मतदारांशी संवाद साधला. शेगाव शहरातील मोक्याच्या ठिकाणी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भूमिका विषद केली.
बुलडाणा जिल्ह्याचा आपल्याला कायापालट करायचा आहे. स्वातंत्र्यानंतर जेवढी विकासकामे जिल्ह्यात झाली नाहीत त्यापेक्षा अधिक गतीने काम आपण पुढच्या ५ वर्षात करू असे संदीप शेळके म्हणाले. बुलडाणा जिल्ह्याची ओळख आपल्याला विश्वपटलावर न्यायची आहे. शेगाव, लोणार, सिंदखेडराजा, ज्ञानगंगा अभयारण्य यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करायचा आहे. प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी झाली तर रोजगाराचा प्रश्न सुटेल. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न, तरुण आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. राजकीय इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे असे म्हणत शेळके यांना मतदारांना मतरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. मी संसदेत पोहचलो तर पुढच्या ५ वर्षात असे काम करील की पुढच्या निवडणुकीत प्रचार करण्याची गरज पडणार नाही असेही संदीप शेळके म्हणाले.
एकंदरी सर्व निवडणूक लढवत असलेले उमेदवार हे आपलं प्रचाराची सुरुवात अर्ज दाखल करणे असो किंवा प्रचार कार्यालय हे शेगाव मध्ये देण्याकरिता सदैव अग्रक्रम ठेवतात असं म्हणायला हरकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.