Breaking

खांमगावात ५० फुट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन.. पुतळा दहन पाहण्यासाठी एकच गर्दी

स्पॉट नेम – खामगाव
————————-
Slug : खांमगावात ५० फुट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन..
पुतळा दहन पाहण्यासाठी एकच गर्दी
————————-
Anchor : प्राचिन काळापासुन नावाजलेल्या व आपली सांस्कृतीक ठेवा असलेल्या खांमगावातील सराफा भागातील बालाजी संस्थानच्या वतीने अनेक वर्षापासुन विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा असुन यावर्षी देखील ५० फुट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करून विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Vo : यामध्ये सर्वप्रथम दुपारी ३ वाजता बालाजी मंदिर सराफा येथे सर्वप्रथम ध्वजारोहन करुन भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अश्वरथात श्रीराम, लक्ष्मण व हनुमान यांच्या वेशभुषेत आकर्षक युवक विराजमान झाले होते.या शोभा यात्रेत विशेष आकर्षण म्हणुन अग्रस्थानी भगवान गणेशजीची झाँकी, सोबतच भगवान बालाजीची झाँकी होती.सदर शोभा यात्रा फरशी, मोहन चौक, महाविर चौक, सरकी लाईन, निर्मल टर्निंग, गवळीपुरा, जुना गौरक्षण रोड या मार्गाने मार्गक्रमण करित सायंकाळी रावण टेकडी येथे पोहचली, यावेळी यावर्षी प्रथमच ड्रोणद्वारे रावणटेकडी येथे पालखीवर व उपस्थित भक्तांवर व सर्व झाँकींवर पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यानंतर रावणाच्या ५० फुट उंचीच्या भव्य पुतळ्याचे दहण करण्यात आले सोबतच मेघनाथ व कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी रावण टेकडी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

बाईट – गोपाल अग्रवाल (अध्यक्ष, बालाजी संस्थान)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.