Breaking

बुलढाणा टुडे वेब न्यूजच्या वृत्तांताला विश्वासार्हतेची दाद… विश्वासराव पाठक.. महाराष्ट्र राज्य वीज कंपनी सूत्रधारी (स्वतंत्र ) संचालक.

बुलढाणा टुडे वेब न्यूजच्या वृत्तांताला विश्वासार्हतेची दाद…
विश्वासराव पाठक.. महाराष्ट्र राज्य वीज कंपनी सूत्रधारी (स्वतंत्र ) संचालक.
बुलढाणा जिल्हा व परिसरातील घडामोडींचे ताजे आणि सखोल वृत्तांत प्रसारित करणाऱ्या बुलढाणा टुडे वेब न्यूजच्या कार्याची महावितरणचे सूत्रधारी कंपनी चे स्वतंत्र संचालक विश्वासराव पाठक यांनी प्रशंसा केली आहे.जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या विश्वासराव पाठक यांनी बुलढाणा पुढे या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अमोल सराफ व त्यांच्या टीमच्या पत्रकारितेतील प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की, या वेब न्यूजचे वृत्तांत वाचनीय आणि माहितीपूर्ण असतात. त्यांनी वृत्तवाहिनीच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.स्थानिक घडामोडी जनतेपर्यंत तत्परतेने पोहोचविण्याचे कार्य करत असलेल्या बुलढाणा टुडे वेब न्यूजच्या टीमने अधिक प्रगल्भतेने काम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.