Breaking

महावितरण कार्यकारी संचालकाची अचानक भेट देत* *शेगाव आणि बाळापूर उपविभागाचा घेतला आढावा*

*महावितरण कार्यकारी संचालकाची अचानक भेट देत*

*शेगाव आणि बाळापूर उपविभागाचा घेतला आढावा*

महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी बाळापूर आणि शेगाव उपविभागाला अचानक भेट दिली. वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे,करण्यात आलेले उपाय-योजना,देखभाल दुरूस्तीची कामे,वीज बिल वसूली आणि उपविभागात सुरू असलेल्या विविध योजनाचा आढावा घेतला.यावेळी मुख्य अभियंता राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
आढावा घेतांना प्रादेशिक संचालक म्हणाले की,वीज सेवा केवळ वीज ग्राहकांच्या घरातीलच नाही तर त्यांच्या जीवनातील अंधार दुर करणारी सेवा आहे. वीज ग्राहकांना अखंडित सेवा द्या,त्यांच्या तक्रारी सोडविण्याला प्राधान्य द्या, ग्राहकांशी सौजन्याने वागा. महावितरणच्या ऑनलाईन सेवेचा वीज ग्राहकांना लाभ देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.ग्राहकांशी जवळीक साधून ग्राहकांमध्ये महावितरणप्रति विश्वास निर्माण करणारी सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्या.

महावितरणचे अस्तित्व हे वीजबिलांच्या महसूलावरच अवलंबून आहे. गेल्या तीन चार महिन्यांमध्ये महसूलाच्या उद्दिष्टाप्रमाणे बिलांची वसूली झालेली नाही, ही गंभीर बाब आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य पर्याय नाही. थकबाकी व चालू वीजबिलांचे उद्दिष्ट दरमहा पूर्ण करावे. तसेच जुन्या नादुरुस्त किंवा सदोष वीजमीटरमुळे महावितरण व ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. असे जुने मीटर तातडीने बदलविण्याच्या निर्देश यावेळी त्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.