Breaking

ग्रीनाथॉन’ स्पर्धेचा अतिरिक्त पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते शुभारंभ 500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग जवळपास 800 स्पर्धकांचा चा आकडा गाठणार..!

एकाच वेळी 2800 वृक्षारोपण करण्यात येणार... प्रत्येकाला मिळणार वृक्षारोपणाची संधी....!

ग्रीनाथॉन’ स्पर्धेचा अतिरिक्त पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते शुभारंभ

500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग जवळपास 800 स्पर्धकांचा चा आकडा गाठणार..!

एकाच वेळी 2800 वृक्षारोपण करण्यात येणार…
प्रत्येकाला मिळणार वृक्षारोपणाची संधी….!

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे
मिशन ओटू व खामगाव नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी २१ जुलै रोजी ‘ग्रीनाथॉन’ स्पर्धेचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रीनाथॉन स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ७ वाजता अतिरिक्त पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
जनुना तलाव येथून सकाळी ७ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. जनुना तलावाच्या गेटपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचा समारोप जनुना तलावाजवळ होणार आहे. कृष्णप्रकाश प्रसाद हे स्पर्धकांसोबत धावणार आहे. या स्पर्धेतील
सहभागी स्पर्धक व मान्यवरांच्या हस्ते जनुना तलावाच्या काठावरील परिसरात विविध देशी जातीच्या २८०० रोपट्याचे रोपण मान्यवर, कृष्णप्रकाश प्रसाद व स्पर्धकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना एकूण १२ हजाराची रोख बक्षीसे व मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट व रोपटे देण्यात येणार आहे. आरोग्य निरोगी राखण्याचा एक
भाग म्हणून ग्रीनाथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके व मिशन ओ २ च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी साई डेंटल क्लिनीक, नॅशनल हायस्कुल समोर, खामगाव येथे किंवा ९००४७१७२७२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.