Breaking

ज्यांनी दाखवली बंदूक त्यांना दाखवला रोजगाराचा मार्ग बुलढाण्यातील बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांचा स्तुत्य उपक्रम

बुलढाणा
स्पॉट. बुलढाणा
*ज्यांनी दाखवली बंदूक त्यांना दाखवला रोजगाराचा मार्ग बुलढाण्यातील बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांचा स्तुत्य उपक्रम*!
बुलढाणा
नुकताच काही दिवसापूर्वी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांचा अपर्णाचा कट रचण्यात आला होता मात्र आता चांडक यांनी अपर्णाचा कट असणाऱ्या त्या तीनही युवकांना रोजगार देण्याची किंवा व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेत कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एक कौतुकाचा मार्ग म्हणून चांडक यांची दाखवलेल्या मोठ्या मनाच्या मार्गाची चर्चा होत आहे. याबाबत जेव्हा आमच्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन च्या बुलढाणा प्रतिनिधी अमोल सराफ यांनी बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्याशी फोनवरून संवाद साधला तेव्हा त्यांनी तिन्ही युवक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसल्याची माहिती त्यांनी त्यांच्याबद्दल घेतले असता निदर्शनात आले .की ती ते युवक क्रिमिनल वृत्तीचे नसून बेरोजगारीने त्रस्त होऊन त्यांनी या मार्गाकडे वळण्याकरता प्रवृत्त होत आहे. त्यामुळेच राधेश्याम चांडक यांनी त्यांच्या पाल्यांना बोलवून या तिन्ही युवकांकरता रोजगार किंवा व्यवसाय चा मार्ग देण्याची तयारी दर्शवली आहे .एकंदरीत या सर्व विचारांचा सर्वत्र कौतुक होत आहे .की आज बेरोजगारी मुळे युवक त्रस्त असताना गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असताना त्याला मुख्य प्रवाहात किंवा गांधीगिरीच्या माध्यमातून का होईना एक संधी देण्याकरिता राधेश्याम चांडक यांनी दाखवलेलं हे पाऊल किंवा मार्ग कौतुकास्पद आहे असे म्हटल्यास वाव ठरणार नाही.

*बातमी करता ठळक मुद्दे*

*खळबळजनक… बुलडाणा अर्बनच्या भाईजी आणि माजी आमदार चैनसुख संचेतींना किडनॅप करण्याचा होता* प्लॅन… दिल्लीतून आयबीने तिघांना उचलले. होतें
झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या तिघांना दिल्लीत आयबी ने अटक केली होती.अटक करण्यात आलेले तिघेही संशयित बुलडाणा शहरातील रहिवाशी असून तिघा आरोपींना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले होते.
पोलिसांनी त्या तिघांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली होती श्रीमंत होण्यासाठी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा चैनसुख संचेती यां दोघानाही किडनॅप करण्याचा प्लॅन तिघांनी रचल्याचे समोर आलेय… मिर्झा आवेज बेग, शेख साकीब शेख अन्वर, उबेद खान शेर खान, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते बुलडाणा शहरातील शेर -ए -अली चौकातील राहणारे आहेत… तिघेही काही दिवसांआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते… बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला…. बँक लुटण्यासाठी त्यांनी एक एअर गन सुद्धा विकत घेतली होती … बँक लुटल्यानंतर कार खरेदी करायची, ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीला किडनॅप करून कोट्यवधी रुपये कमवायचे असा प्लॅन त्यांचा होता… दरम्यान दिल्लीत आयबी पोलिसांनी संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेतले… बुलडाणा पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन त्यांना बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात दिले… चौकशी दरम्यान राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांना किडनॅप करण्याचा त्यांचा प्लॅन होता. आता याच तिन्ही युवकांना राधेश्याम चांडक यांनी रोजगाराचा प्रस्ताव दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.