Breaking

नागरिक आणि वॉर्डप्यून यांच्या समनव्ययातून स्वछतेकडे वाटचाल….

खामगाव- येथील सिव्हिल लाईन, प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज 4 ऑगस्ट रोजी नागरिक आणि वॉर्डप्यून यांचा समनव्यय आणून परिसरातील समस्यांवर समाधानकारक चर्चा करण्यात आली.
याबाबत असे की, परिसरातील प्रत्येक समस्या आणि नागरी सुविधा यांचा विचार करता त्याचे निराकरण होण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असल्यास प्रशासनास सुध्दा याची मदतच होईल.या उद्देशाने येथील सिव्हील लाईन, भिसे प्लॉट प्रभाग क्रमांक 4 मध्ये ‘समनव्ययातून स्वछतेकडे’ हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.त्याअंतर्गत आज वॉर्डप्यून विनोद बघेल, गोपाल गायकवाड यांनी सर्व स्वछता कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिकांना विचारात घेऊन परिसरातील समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे आता परिसरातील स्वछता आणि समस्यांचे निराकरण होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
यावेळी नगर परिषद वॉर्डप्यून विनोद बघेल, गोपाल गायकवाड ,श्रीकांत भुसारी,राजु तोंडे,विजय कुकरेजा, मंगेश इंगळे यांचेसह सर्व स्वछता कर्मचारी उपस्तीत होते.अशी माहिती एका पत्रकातून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.