Breaking

वाढदिवसाला प्रत्येकाने वृक्षारोपण करावे-डॉ.कालिदास थानवी*

*मिशन ओटू चे एकच मिशन*
वाढदिवसाला एक झाड लावण्याकरता दिल्या जाते अभिनव प्रोत्साहन..

*वाढदिवसाला प्रत्येकाने वृक्षारोपण करावे-डॉ.कालिदास थानवी*

उपक्रमाचे होते सर्वत्र कौतुक.!

प्रतिनिधी (खामगांव )
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मागील अनेक वर्षांपासून सेवाभावी पद्धतीने मिशन ओटू या झाडे लावा झाडे जगवा या प्रेरणेने तयार झालेला एक विचार आज वृक्षारोपण जसजसे वाढत आहे .तसतसं त्याची सदस्य संख्या सोबत झाडे देखील वाढत आहे.

यामध्ये परिसरातील नागरिकाला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कराच असते त्याला मोफत पद्धतीने याकरता प्रोत्साहन केल्या जाते. हजारो झाडे नुसते या उपक्रमांतर्गत लावलेच नाही .तर ते जगण्याकरता देखील 365 दिवस यातील सदस्य निस्वार्थ भावने ने काम करत असतात. या अंतर्गतच आज मागील अनेक वर्षापासून मिशन ओटू चे सेवासदस्य म्हणून कार्यरत असलेले अमोल सराफ यांचा वाढदिवस आज याच जनुना येथील नगरपरिषद खामगाव व मिशन ऑक्सिजन बहुउद्देशीय संस्था द्वारा मिशन ओटु पार्क येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कालिदास थानवी यांच्या उपस्थितीत , उपक्रम सेवक सदस्य धर्मेश नागराणी यांच्या समवेत वृक्षारोपण करीत साजरा करण्यात आला.
या अशा अभिनव संकल्पनेमुळे दिवसेंदिवस या विचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमांतर्गत आता येथे मिशन ओटू पार्क भविष्यामध्ये कार्यान्वित होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना एक निसर्गरम्य ठिकाण अनुभवता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.