Breaking

*100 दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करावा,_ देवेंद्र फडणवीस .

देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये..! इज ऑफ लिव्हिंग'वर सर्वाधिक भर द्या, फडणवीसांचा नवा मंत्र...

विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांनी आता सरकार कसे गतिशील राहील याकडे शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅन सर्व विभागाने तयार करावा अशी आदेश सोडले आहे.
अत्यंत काटेकोर याची अंमलबजावणी व्हावी असेही त्यांनी सांगितले आहे प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत केंद्र आणि राज्याची प्रत्येक योजना पोहोचण्याकरता प्रत्येकाने कटिबद्ध असले पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रत्येक विभगााला 100 दिवसाचा कार्यक्रम सादर करा असे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. तसेच पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर द्या असेही फडणवीस म्हणाले
लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या मिळतील यावर भर द्या..

फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या विभागाचे पोर्टल अपडेट करा. ते अधिक प्रभावी करा. त्यातून लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या लोकांना कशा मिळतील, यावर भर दिला पाहिजे. उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईल.
इज ऑफ लिव्हिंग’वर सर्वाधिक भर द्या, फडणवीसांचा नवा मंत्र

सर्व संकेतस्थळ हे RTI फ्रेंडली करा. 26 जानेवारीपर्यंत यावर टार्गेट करा. ‘इज ऑफ लिव्हिंग’वर सर्वाधिक भर द्या. सर्वाधिक लोक आपल्याकडे कशासाठी येतात आणि त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर द्या. 6/6 महिन्यांचे दोन टप्पे करून हे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी माजी अधिकाऱ्यांची समिती गठित करून एक अभ्यास अहवाल तयार करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.