Breaking

प्रत्येकांच्या कामाकडे बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचा सूचक इशारा* प्रादेशिक संचालक,परेश भागवत

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ कमी वीज वापर असणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवा*

*प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ कमी वीज वापर असणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवा*

*प्रत्येकांच्या कामाकडे बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचा सूचक इशारा*
प्रादेशिक संचालक,परेश भागवत

*बुलडाणा (प्रतिनिधी)*
विजेचे महत्व आहे,म्हणूनच महावितरणच्या कामालाही महत्व आहे.त्यामुळे अखंडित वीज सेवा,ग्राहक सेवेत सुधारणा, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रत्येक महिन्याच्या वीजबिलाची अपेक्षित असलेली शंभर टक्के वसूली या चतुसूत्रिवर काम करा,असे निर्देश प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी दिले.
विद्युत भवन अकोला येथे महावितरणच्या विविध कामाच्या प्रगतीचा आढावा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी घेतला. मुख्य अभियंता राजेश नाईक,अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके,अजय शिंदे,प्रतिक्षा शंभरकर सह सर्व विभाग प्रमुख आणि विभागीय कार्यकारी अभियंते या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी भागवत म्हणाले,की प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेत लाभ जास्त वीज वापर
असणारे ग्राहक घेत आहेत. परंतू एक किलोवॅट,दोन किलोवॅट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना अधिक लाभदाई असून त्यांना अनुदानही जास्त आहे.त्यामुळे सेवा पंधरवाड्यात कमी वीज वापर असणाऱ्या वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा,कर्जाची सोय आणि अनुदानाची माहिती देवून जास्तीत जास्त वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळवून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
आरडीएसएस योजनेत सुरू असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामामुळे गावठाण आणि कृषी वाहिनी वेगळी होणार असून त्याचा थेट फायदा महावितरणची तांत्रिक हानी कमी होण्यासाठी आणि वीज ग्राहकांना दर्जेदार वीज देण्यासाठी होणार आहे. शिवाय वीज पुरवठा खंडित होण्याच्या वेळेत लक्षणीय घट होणार आहे.तसेच तांत्रिक हानी कमी झाल्याने याचा एकंदरीत लाभ दिर्घकाळात वीज दराच्या स्थैर्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
वीजबिलाची वसूली हा महावितरणचा आत्मा असल्याने प्रत्येक महिन्याचे शंभर टक्के वीजबिल वसूल झालेच पाहिजे. तथापि वीज ग्राहकांना अचूक बिलींग देणे ही महावितरणची जबाबदारी आहे, त्यामुळे नादुरूस्त मीटर बदलवून देण्याच्या कामाला गती द्या. शुन्य वीज वापर असणाऱ्या ग्राहकांची प्राधान्याने तपासणी करा,वीज वापर नसेल तर,वीज बिल दुरूस्त करून द्या आणि वीज चोरी आढल्यास कारवाई करा . मागेल त्याला वीज जोडणी हे महावितरणचे धोरण असल्याने,नविन वीज जोडणीसाठी आलेले अर्ज प्रलंबित न ठेवता कृतिमानकानुसार वेळेत द्या,वितरण हानी असलेल्या भागात भरारी पथकाच्या माध्यमातून नियमित कारवाई करा असे स्पष्ट निर्देश देतांना प्रत्येकांच्या कामाकडे बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचा सूचक इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.