Breaking

डॉक्टर कालिदास थानवी यांनी रुग्णाला दिले वाढदिवसा निमित्त रिटर्न गिफ्ट !…

खामगाव…
डॉक्टर कालिदास थानवी यांनी रुग्णाला दिले वाढदिवसा निमित्त रिटर्न गिफ्ट !…..
दवाखाना म्हटला की रुग्णांना अनेक वेळा धडकी भरते .झालेल्या व्याधीमुळे नाही तर तिथे गेल्यानंतर आपल्या तपासण्या ,केव्हा नंबर लागतो व त्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला
असे उपच्चार दिले जातात.
बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यात होमिओपॅथीच्या माध्यमातून रुग्णसेवा व अनेक सर्वसामान्यांना माहीत नसलेल्या मोफत सेवा व मिशन O 2 मार्फत संपूर्ण राज्यात झाडे लावा झाडे जगवा हा एक अभिनव संकल्पना घेऊन डॉक्टर कालिदास हे अनेक वर्षापासून कार्यरत आहे.
आपल्या हसमुख स्वभाव व प्रत्येक रुग्णाला आपुलकीने विचारपूस करून त्याचे निदान करणे हा जणू त्यांचा एक छंदच म्हणावा लागेल . हो छंद कारण छंद हा मनुष्य हसत खेळत जपत असतो. त्याच पद्धतीने त्यांनी आपली वैद्यकीय सेवेला देखील एक छंद समजून प्रेमाने जोपासत आहे.केव्हाही सहज उपलब्ध होत आपल्या रुग्णाला चांगल्या पद्धतीने कशी रुग्ण सेवा आपण देऊ शकतो .या करता त्यांची धडपड सतत सुरू असते. डॉक्टर म्हटल्यानंतर रुग्णांना सेवा व रुग्णसेवाच हीच ईश्वर सेवा समजून त्यांनी शपथ घेतली असते. पण जसजसा काळ पुढे जातो त्याला एक व्यवसायाचे रूप अनेक ठिकाणी दिसून येते .त्यानंतर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातले वाद अनेक वेळा समोर येतात. ज्यावेळेस रुग्णांना अति दक्षता च्या वेळेत डॉक्टरची आवश्यकता असते मुख्यतः रात्रीच्या वेळेस त्यावेळेस तज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नाही पण अशातच एक त्यांच्या एका रुग्णाला वाढदिवसाच्या दिवशी अनुभव आला .व त्यांनी तो बुलढाणा टुडे सोबत शेअर केला.
संध्याकाळी (१३ नोव्हेंबर) डॉक्टर यांचा वाढदिवस असताना जेव्हा त्यांना रुग्णान फोन केला. तेव्हा त्यांनी क्लिनिक बंद असल्यामुळे आपण आपणास फोनवर आपल्या रिपोर्ट बाबत चर्चा करत आहोत . असे सांगीतले.त्यांनी त्वरित त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी बोलावून घेतले. एकीकडे वाढदिवसाचा सोहळा अभिष्टचिंतन मित्रवर्ग त्यांना शुभेच्छा देण्याकरता गर्दी करत असताना. त्यांनी त्या रुग्णाला संपूर्णपणे आलेल्या रिपोर्ट बाबत समाधान केले व त्यानंतर नियमित परिचय असलेला हा व्यक्ती हे सर्व पाहून भारावून गेला. फोन लावल्यानंतर आपण एवढ्या आनंदाच्या क्षणांमध्ये मित्र वर्गात असताना आपल्या घरी आपल्या परिवारात असताना देखील रुग्ण सेवा त्याचे समाधान करून त्याला केक भरवला. व त्याच्या सोबत असलेल्या परिवार सदस्यांनी देखील हे त्यांच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांचे डोळे देखील पाणवले. डॉक्टर असावा तर असा असे शब्द त्यांच्या तोंडी निघाले. एकंदरीत आज विशेषतः अनेक वेळा उत्सव किंवा रविवार अशा दिवशी तज्ञ डॉक्टर सहज उपलब्ध होत नाही. त्यांच्या सहाय्यक च्या माध्यमातून सेवा घ्यावी लागते .पण थेट वाढदिवसाच्या दिवशी डॉक्टर कालिदास थानवी यांनी एका प्रकारे रुग्णसेवा प्रथम कर्तव्य.. हे ब्रीदवाक्य जोपासत त्या रुग्णाला चक्क घरी बोलावून त्यांचे समाधान करून एक प्रकारे स्वतःच्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट दिले असे म्हटले तर वावग ठरणार नाही….

*रुग्णांनी शेअर केलेला स्वअनुभव बुलढाणा टुडे च्या माध्यमातून आपल्यासमोर मांडला आहे*

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.