Breaking

अखंडित वीज पुरवठ्यात लाईनमनची भूमिका महत्वाची;* _अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके_

*लाईनमन दिनानिमित्त जिल्ह्यात महावितरणच्या लाईनमनचा गौरव*

*अखंडित वीज पुरवठ्यात लाईनमनची भूमिका महत्वाची;*
_अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके_

जनसामान्यांना लाईनमन म्हणून परिचीत असणारा महावितरणचा जनमित्र हा महावितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, २४ तास अखंडित वीज पुरवठा करण्यात महावितरणच्या लाईनमनची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले.

‘विद्युत भवन’ बुलडाणा येथे पार पडलेल्या लाईनमन दिनाच्या गौरव संमारंभात ते बोलत होते.यावेळी कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण,सौ.कदम,हास्य कलाकार किशोर बळी, तसेच विभाग निहाय झालेल्या कार्यक्रमात कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाय,विरेंद्र जसमतीया,
रत्नदिप तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना सुरेंद्र कटके म्हणाले की,कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या विजेच्या वापरावर मोजल्या जाते.त्यामुळे राज्यात विकासाची जननी असलेल्या विजेच्या वितरणात महावितरणच्या लाईनमनची भूमिका महत्वाची राहीली आहे.येणाऱ्या काळात जिल्ह्यात पायाभूत तसेच वीज यंत्रणा विस्तारीकरण आणि सक्षमिकरणाची अनेक कामे होत आहे. त्यानुसार ती कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

जिल्ह्यात विभागनिहाय लाईनमन दिनाच्या औचित्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्ह्यातील जनमित्रांचा गौरव करण्यात आला. होते.बुलडाणा येथे हास्य कलाकार किशोर बळी यांच्या हास्यकलेतून जनमित्रांना तणावमूक्त जीवन कसे जगावे यावर माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.