Breaking

निवडणुकीची रणधुमाळी…. आणि त्यात खासदार प्रतापराव जाधव थेट पोहोचले नुकसानग्रस्त पाहणी करता…

प्रचार नंतर आधी शेतकरी महत्वाचा खा. प्रतापराव जाधव पोहचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांना दिला धीर..

प्रचार नंतर आधी शेतकरी महत्वाचा खा. प्रतापराव जाधव पोहचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांना दिला धीर..!
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत.. मात्र या धामधुमीत देखील महायुतीचे उमेदवार तथा खा. प्रतापराव जाधव यांनी प्रचार बाजूला ठेवून आज मोताळा तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याला प्राधान्य दिले.. शेतकऱ्यांना धीर दिला व मदतीसाठी पाठपुरावा करण्याचा शब्द दिला आहे.. यावेळी आमदार संजय गायकवाड हे देखील उपस्थित होते..

मागील दोन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात त्या ती मुख्यतः घाटाखाली मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचे थैमान झाल्याचे चित्र आहे.
पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट हा बुलढाणा जिल्ह्याकरता दिला आहे.
नेमकं काय आहे अवकाळी पावसाची जिल्ह्यातली परिस्थिती व त्याचा काय सांगतो अहवाल
९ एप्रिलला झालेल्या वादळी अवकाळी पाऊस व गारपिटीचा जिल्ह्याला जबर तडाखा बसला आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा कृषी व महसूल यंत्रणांनी जिल्हा प्रशासनाला नुकसानीचा अहवाल सादर केला.यानुसार ६ तालुक्याना अवकाळीचा फटका बसला आहे.प्राथमिक सर्वेक्षण नुसार ‘अवकाळी’चा १०२ गावांना फटका बसला असून तब्बल साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. यामुळे मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. याशिवाय फळबागांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने आंब्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. याशिवाय १४ गावांतील ३०९ घरांची आंशिक पडझड झाली आहे. वीज पडून व झाडाखाली दबून १३ जनावरे दगावली आहे. संग्रामपूर तालुक्यातील तिघेजण वीज पडून गंभीर जखमी झाले. राहुल छळकर, विशाल छळकर, मोहन डोंगरे अशी जखमींची नावे असून ते ट्रॅक्टर ने जात होते.
खामगाव तालुक्यातील ढोरपगाव, वडजी भेंडी, बेलखेड, कवडगाव, अंबरगड, चिचखेड, काळेगाव, दिवठाणा, वर्णा, रोहणा, निमकवळा या परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजतापासून अचानक गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.त्यामुळे मका, ज्वारी, कांदा, गहु, केळी बागांचे नुकसान झाले. गहू, ज्वारी, मका सोंगणीला आले आहे. काही शेतकर्यांची सोंगणी आटोपली असून, बहूतांश शेतकर्यांची सोंगणी बाकी आहे. आठ दिवसात पीक घरामध्ये येणार होते. मात्र त्यापूर्वीच झालेल्या गारपीटीने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला. शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. या आठवड्यात तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. अवकाळीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी शेतकरी हैराण झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.